जंगलाच देणं – मारुती चितमपल्ली / Janglacha Dena – Maruti Chitampalli

200.00




After successful transaction you will get Courier Tracking Link within 24 to 48 hours on your mobile number / email id. Product will be delivered to you within maximum 8-10 days.

  • Pages: 135
  • Binding: Paperback
  • ISBN13: 9789382824428

Stories on nature. Writer is ex forest officer. He wrote the stories of their experience while their duty in forest.

मुंबई सकाळ:
“चितमपल्लींनी हातचं न राखता हे जंगलचं देणं हात भरभरून दिलं आहे. अंत:करणाचा जिव्हाळा असेल, अनुभवात जिवंतपणा असेल आणि भाषेवर प्रभुत्व असेल तर किती उत्तम ललित गद्य जन्माला येऊ शकतं याची ही झलक आहे. त्यात कथात्मतकता आहे, काव्यात्मकता आहे, भावनेने ओथंबून आलेल्या क्षणातील हुरहूर आहे. संवेदनाशील मनाची स्पंदने आहेत. तरल सौदर्यदृष्टी आहे आणि या सर्वात राहूनही अलिप्त असलेली चिंतनात्मक वृत्ती आहे. चित्रकार आलमेलकरांनी आपल्या सुरेख रेखाटनांनी हे ‘जंगलाचं देणं’ सजवलं आहे.

“प्रिय चितमपल्ली
सप्रेम नमस्कार,

तुमचा म. टा. मधला ‘सांबाराचे लोटन’ हा लेख मला फार आवडला. तुमचे लेखन असेच ताजे व वाढते रहावे, ही इच्छा आहे. महानदीच्या गूढ गुंजनातल्या गाण्यातल्या दोन ओळींतला अर्थ तुम्ही म्हणता तो सयुक्तिक वाटतो. सांबाराचे लोटन अथवा पाटन काय ते मला माहित नव्हते. तुम्ही ते चांगले व्यक्त केलेत याबद्दल धन्यवाद.”
— दुर्गा भागवत

“प्रिय चितमपल्ली
सप्रेम नमस्कार,

तुमचा लेख ‘गिधाडांचा टापू’ फार छान वाटला. टापू मनोमनी उभा रहातो. मला तुमच्या संस्कृत ग्रंथवाचनाचा खूप हेवा वाटतो. जाता जाता तुम्ही सुरेख संस्कृतची अवतरणे देता. कटाक्षाने पशुपक्षांची संस्कृत नावे वापरता. त्यामुळे तुमचे लिखाण प्रौढ व निखळ मर्‍हाटी होते. मी तर असे म्हणतो की तुम्ही असेच अनेक टापू चितारावेत आणि एखादे उत्तम पुस्तक मराठी वाचकांना द्यावे. वन्य प्राणी हा विषय आजवर मराठीला पारखाच राहिला आहे. गिधाडासारख्या जंगलातील ‘दलित’ पक्षावर तुम्ही छान लिहिले आहे. श्री. आलमेकर यांच्या चित्राविषयी मी बालकाने काय बोलावे?”
— व्यंकटेश माडगूळकर

“प्रिय चितमपल्ली
सप्रेम नमस्कार,

तुमचे शांत, संयमी तरी तरल हळुवार लेखन ही गर्व करायची वस्तू आहे.”
— गो. नी. दांडेकर

“प्रिय चितमपल्ली
सप्रेम नमस्कार,

पक्षांची तपशिले, त्यांच्या वीणीची भातुकली तुम्ही निर्मितीच्या पातळीवर साकार केलीत.”
— ग्रेस

“प्रिय चितमपल्ली
सप्रेम नमस्कार,

आपले लेख मी सतत वाचते. ‘मोहा फुलला’ सारखे लेख मी अतिशय आवडीने वाचलेले आहेत.”
— शांता ज. शेळके

“प्रिय चितमपल्ली
सप्रेम नमस्कार,

तुम्ही एक असे आहात जबरदस्त की तुमच्या लेखनाने मराठीत एक नवी वाट पाहून दाखवली! मला अभिमान वाटतो.”
— रविंद्र पिंगे

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Shopping Cart
Scroll to Top